पोलिसांच्या गाडीला अपघात, चार जण जखमी एकाची हालत गंभीर. - In India Live

Breaking News

31/05/2020

पोलिसांच्या गाडीला अपघात, चार जण जखमी एकाची हालत गंभीर.

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह
मुंबई, दि. 30. ठाणे लोहमार्ग पोलीस पथक हे भायखळा जेल येथे महिला आरोपीचा ताबा घेऊन न्यायालयीन कामकाजा करता, बोलेरो या शासकीय वाहन क्र. MH-05-P-130 ने जात असताना फ्री वे, नॉर्थ बॉण्ड, मुंबई या ठिकाणी गाडीचा पुढील बाजूचा उजवा टायर फुटल्यामुळे, सदरची गाडी डिव्हायडरला धडकून ड्रायव्हर बाजूस पडल्यामुळे गाडीचे वाहन चालक पो.शिपाई केडया वसावे, वय 30 वर्षे, रा.ठी. शिववैभव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गाडीतील 1) पो.ह. काळे 2) म.पो.ना. श्रीमती गांगवे 3) म.पो.शि. शनागर 4) महिला आरोपी यास्मिन पाशा शेख हे सुध्दा जखमी झाले आहेत. जखमींना जे. जे. हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment