मुंबई १४ : नोव्हेंबर २०२३ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ओबीसी नोंद असल्याचा दाखला सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो माझा दाखला आहे तो खरा आहे.त्यावर नमूद जात व धर्म हे खरे आहे.मात्र, काही लोकांनी दुसरा ओबीसी असल्याचा दाखला फिरवला.ओबीसींबाबत आदर व आस्था मला आहे.मात्र जन्माने प्रत्येकाला जी जात असते ती मी लपवू शकत नाही.संपूर्ण जगाला माहिती आहे माझी जात कोणती आहे.ती मी लपवू इच्छित नाही.जातीवर समाजकारण-राजकारण मी आजवर केले नाही आणि करणार नाही.मात्र,या वर्गाचे जे प्रश्न आहेत त्यासाठी जो हातभार लावावा लागेल तो मी निश्चित लावेल अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
No comments:
Post a Comment