डोंबिवलीत श्रीमती फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला - In India Live

Breaking News

19/05/2025

डोंबिवलीत श्रीमती फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला

मुंबई दि 12.5.2005 रोजी, श्रीमती फ्लॉरेन्स नाइटिंगल यांच्या जन्म दिनी जागतिक परिचारिका दिन हा जगभरात साजरा होत असतो. या दिनाचे औचित्य साधून, सेवानिवृत्त परिसेविका यांनी सेवानिवृत्त परिचारिकाना  एकत्रित आणून डोंबिवली येथे सुयोग हॉटेल मध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .या भव्य दिव्य स्नेहसंमेलन सोहळ्याचे परिचारिका दिन आणि  सर्व सेवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यात रमून गेल्यानंतर थोडा वेळ स्वतःसाठी काढून जुन्या मैत्रिणीच्या भेटीगाठी व्हाव्यात. हे उद्दिष्ट असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजिका श्रीमती सरोज रांजणगावकर (पाटील) यांनी पत्रकारांसी बोलताना सांगितले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून असलेल्या श्रीमती वृषाली देशपांडे  सेवानिवृत्त पाठ्यनिर्देशिका,जी. टी.रुग्णालय मुंबई,यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं कि परिचारिका हे आरोग्य सेवा प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे, रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असते, त्यामुळे रुग्णासोबत स्वताची काळजी घेतली पाहिजे या विषयावर भाष्य केले,तसेच परिचारिका अंजना सोनावणे,परिचारिका शुभांगी सोनवणे, सेवानिवृत्त सहाय्यक अधिसेविका, रेखा लोंढे सेवानिवृत्त सहाय्यक अधिसेविका मीरा भाईंदर मुंबई या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आली, तसेच सर्व  सेवानिवृत्त परिचारिकांनी शपथ ग्रहण केली. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व सेवानिवृत्त परिचारिकांना मार्गदर्शन केले व इतर सेवानिवृत्त परिचारिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमात सर्वांनीच मनसोक्तपणे स्नेहभोजनाचा एकत्रितपणे आस्वाद घेतला. तसेच सर्व सेवानिवृत्त परिचारिकांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला,
या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत श्रीमती सरोज रांजणगावकर (पाटील) व श्रीमती संजीवनी गायकवाड, सेवानिवृत्त परिसेविका, श्रीमती अर्चना कणकोसे पाटील, सेवानिवृत्त परिसेविका, श्रीमती रजनी सरदार, सेवानिवृत्त परिसेविका, श्रीमती वैशाली मेंढे, परिसेविका श्रीमती दीपा चव्हाण, सेवानिवृत्त बालरुग्ण तज्ञ परिचारिका,श्रीमती मंजुषा जाधव, यांनी घेतली. तसेच मोलाचे सहकार्य श्री अनिल रांजणगावकर , सेवानिवृत्त इंजिनियर ( सिडको ,नवी मुंबई ) यांनी केले.

No comments:

Post a Comment