प्रफुल चव्हाण | इन इंडिया लाईव्ह
उल्हासनगर, दि. १ : कॅम्प क्रमांक ३ येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन १७ परिसरातील गोल्डन पॅलेस लॉजिंग येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू आहे. या अवैध धंद्यात मोठे अर्थकारण दडलेले असल्याने, बड्या अधिकारी त्यात भक्कम मोठी रक्कम घेऊन पदोन्नती घेतल्याची चर्चा पूर्ण शहरात सुरू आहे, अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करण्या साठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पिटा सेल देखील आहेत,परंतु या लॉजवर कुठल्याही सेलने कारवाई करायची हिम्मत केलेली नाही,या परिसरात निवासी वस्ती तसेच शाळा आणि महाविद्यालये असल्याने विद्यार्थिनी व महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. बस किंवा रिक्षाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींकडे काही मद्यधुंद लॉजवर जाणारे व्यक्ती अश्लील इशारे करत असल्याचाही आरोप महिला व विद्यार्थिनीनि केला आहे.या लॉजवर जाणीवपूर्वक होत असलेले दुर्लक्ष, प्रशासनाने लक्ष घालून यावर त्वरित कडक कारवाई करावी, अन्यथा पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न पटलावर मांडण्यासाठी शहरातील लोक मागणी करत आहेत.

No comments:
Post a Comment