मुंबई मॅरेथाॅनमध्ये 'बेटी बचाओ' जनजागृती. - In India Live

Breaking News

20/01/2019

मुंबई मॅरेथाॅनमध्ये 'बेटी बचाओ' जनजागृती.

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव

मुंबई, दि. 20 : येथे आज आयोजित करण्यात आलेल्या मुंबई मॅरेथाॅनमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश देण्यात आला. सहभागी स्पर्धकांनी हातात फलक घेऊन विविध घोषणांद्वारे या अभियानाबाबत जनजागृती केली. 

मॅरेथाॅनमध्ये मुलगा - मुलगी एकसमान, मुलगीसुद्धा ठरु शकते कुटुंबाची सक्षम वारसदार, मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल आदी संदेश देण्यात आले. तसेच कुपोषण रोखण्यासाठी मुलींच्या पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. मॅरेथाॅनमध्ये स्पर्धकांनी हाती घेतलेले 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

या मोहीमेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त इंद्रा मालो, महिला - बालविकास विभागाचे सहसचिव लालसिंग गुजर, कक्ष अधिकारी रमेश सरफरे, सीमा डोके, कुलाबा बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना तोमर आदी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment