जागतिक तंबाखू नियंत्रण दिन साजरा - In India Live

Breaking News

19/01/2019

जागतिक तंबाखू नियंत्रण दिन साजरा

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव
मुंबई  दि.18- तंबाखू सेवनामुळे होणा-या आरोग्यावरील दुष परिणामाची जनतेला माहिती व्हावी यासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय  अंतर्गत जागतिक तंबाखू नियंत्रण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा शल्यचिकित्सक सुधाकर शिंदे,यांनी दिप प्रज्वलनाने केले,त्या वेळी अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जाफर तडवी,डॉ तेजस्विनी भगत,डॉ मृणाली राहुड,डॉ अरुण चंदेल,समाजसेवक अधीक्षक सतिश वाघ,मेट्रन सुमन गोवंदे ,परिचारिका प्रतिभा मोरे,इत्यादी उपस्थितह होते,कार्यक्रमाला सुरुवात डॉ मृणाली राहुड यांनी केली,डॉ मृणाली राहुड म्हणाल्या की तंबाखूमध्ये जवळपास चार हजार रसायने आढळतात त्यातील कमीत कमी २०० विषारी घटक
आहेत जे निकोटीन,कार्बन मोनोक्साईड, टार,अरसेनिक,फॉरमॅल्डेहाईड इत्यादींचा विषारी घटकांमध्ये समावेश होतो.तंबाकू खाणाऱ्या व्यक्तींमध्ये,टीबी,हृदय विकार,मुख कॅन्सर,आणि फुफुसचा कॅन्सर,असे गंभीर आजार होतात,तंबाखूमधले निकोटीन हे लवकर व्यसन निर्माण करणारं अत्यंत घातक असं रसायन हेरॉइनपेक्ष्या घातक आहे सलग तीन दिवस जर निकोटीन घेतलं तर चौथ्या दिवशी आपलं शरीर आणि मनच ते मागायला लागतं,म्हणजे चौथ्या दिवशी व्यसनाला सुरुवात होऊन जाते,त्यामुळे हार्ट बीअट्स वाढतात,व तरुण मुले मुली महातारे दिसू लागतात.संस्कृती आणि समाजजीवनाचा तो भाग बनला की आपोआपच हे व्यसन सर्वव्यापी होतं,शास्त्र,विज्ञान सांगतं,हे व्यसन सोडणं अतिशय अवघड आहे,व्यसनमुक्ती हा अतिशय कठीण आणि दूरचा उपाय आहे,या व्यसनाची लागलेली लत सुटता सुटत नाही,त्यामुळे देशात,दर वर्षी 8- 9 लाख लोकं तंबाकू सेवन केल्याने मृत्यू पावतात,
पण अपनास जर व्यसन (तंबाकू ) सेवन सोडायचे असेल तर सोडू शकता,त्या करीता मनाचा ताबा ठेवने खूप गरजेचं आहे,तो जर ठेवता आला तर आपण व्यसन (तंबाकू )सेवन नक्की सोडू शकता,असे डॉ मृणाली यांनी सांगितले,त्याच बरोबर डॉ मृणाली म्हणाल्या की माझ्याकडे (तांबकू)व्यसन सोडण्यासाठी 5 सोपे टिप्स आहेत,ते करून पहा,

1) एक प्लॅन बनवा,एखादी तारीख मनात फिक्स करा,कि त्या तारखे पासून तुम्हाला तंबाकू सोडायची आहे

2) एखाद्या कॉन्सल्लोर ची किव्वा एखाद्या मित्रया ची मदत घ्या

3) निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी वापरा- निकोटिन चॅविंग गम,निकोटिन पॅच

4) स्मोकिंग झोने पासून आणि स्मोक करणाऱ्या मित्रानं पासून दूर राहा

5)नवीन एखादी हॉबी सुरु करा.
त्यामुळे व्यसन (तंबाकू ) सेवन सोडण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल.
तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता साकेत कॉलेज ऑफ नर्सिंग च्या विध्यार्थीनीनी उपरोक्त विषयावर पथनाट्यचे सादरीकरण करुन तंबाखु सेवनापासुन होणाऱ्या दुष्परिणामाबाबत प्रकाश टाकला.त्याचप्रमाणे प्रतिभा मोरे परिचारिका यांनी व्यसनाधीनता यावर कविता सादर केली, तसेच डॉ जाफर तडवी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सुध्दा आजच्या वाढत्या लोकसंख्या बरोबरच व्यसनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंध काळाची गरज असल्याची सांगितले,कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुधाकर शिंदे यांनी मध्यवर्ती रुग्णालय या ठिकाणी एन सी डी क्लिनिक असुन सदर आजारावर स्क्रिनींग व औषधोपचार तसेच समुपदेशन उपलब्ध असुन जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,अधिकारी कर्मचारी नर्सिंग स्टाफ तसेच रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक मोठ्यासंखेने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार सतीश वाघ समाजसेवा अधीक्षक यांनी केले.

No comments:

Post a Comment