प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह
मुंबई दि. 6 सचिव राजेंद्र पवार यांचे बरोबर महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेची बैठक झाली.
बैठकीत सिंचन सहाय्यक पदनिर्मिती तसेच ग्रेड पे २४०० याबाबत सकारात्मक भूमिका सचिवांनी घेतली.तसा प्रस्ताव तयार करून पुढे पाठविला जाईल असे आश्वासन दिले.माननीय मंत्री महोदयांच्या आदेशानुसार आपण आंदोलन थांबवावे ही विनंती केली व संघटनेने ती विनंती मान्य करून सदरचे धरणे आंदोलन थांबविले असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे दीलीप आंधळे यांनी दिली.
जलसंपदा विभागातील तृतीय श्रेणी कर्मचारी मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलनास बसले होते.
कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार या पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक हे पद निर्माण करावे, 2400 रुपये ग्रेड पे देण्यात यावा आदी मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनि आंदोलन 4 फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात राज्यातील सुमारे दीड हजार कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मंत्री मोहोदयानी सचिवांना योग्य ती दखल घेण्याचे आदेश दिले होते. सचिवालयातील दालनात झालेल्या बैठकीस गणेश सोनवणे, एम.जी. फंदी लोलो, पुरुषोत्तम कुकडे, गोपीनाथ साळुंखे, नारायण तनमर, विशाल जिरवनकर आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment