प्रफुल चव्हाण इन इंडिया लाईव
मुंबई ,दि.३० सप्टेंबर :- माजी खासदार समीर भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटी घेऊन सन्मान केला.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, अभिनेता चिन्मय उदगीरकर,प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूणे, कार्याध्यक्ष गोरख बोडके,
शहराध्यक्ष कविता कर्डक, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे,युवक जिल्हाध्यक्ष चेतन कासव, योगेश निसाळ, आनंद सोनवणे, कैलास मुदलियार, समाधान जेजुरकर, डॉ. योगेश गोसावी, ज्ञानेश्वर शेवाळे, आशा भंदुरे, पूजा आहेर, विजय पवार, शंकर मोकळ, नाना पवार, नाना सोमवंशी, रवि हिरवे, यशवंत शिरसाठप्रा.ज्ञानेश्वर दराडे, सुनिल पैठणकर, राजू भांडगे, भाऊसाहेब धनवटे, संतोष खैरनार, विनोद शेलार, योगेश कमोद, भालचंद्र भुजबळ, संदीप खैरे, संदीप गांगुर्डे, शिवा काळे, राजेंद्र जगझाप, आकाश कदम, प्रसाद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:
Post a Comment