प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
मुंबई-दी २७ - लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या समाधानकारक यशानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपला टक्का वाढविण्यासाठी व्यूहरचना केलेली आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून ओबीसी आणि महिला कार्ड त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता आहे . लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी आठ उमेदवार म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाला या निवडणुकीत ९० टक्के यश मिळाले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले . या यशामुळे शरद पवारांच्या पक्षामध्ये नवचैतन्य पसरले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा निकाल धक्कदायक होता . लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या पक्षात अजित पवार गटाकडून इनकमिंग ला सुरुवात झाली आहे .
मराठा तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून सध्या राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत या आरक्षणावरून एकमेकांना दोषारोपपत्र सुरु आहे माहुयुतीने अधिवेशनात या प्रश्नावरून शरद पवारांना टार्गेट केले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या प्रश्नावर पवारांना टार्गेट करीत आहेत . या सर्व पार्श्वभूमीवर ३ लाख ८० हजार ७९६ मतदार असलेल्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ६० टक्के ओबीसींची संख्यालक्षात घेता फडणवीस याना मतदारसंघात जेरबंद करण्यासाठी पवारांकडून उषा चौधरी नावाचा ओबीसी महिला चेहरा पुढे आणण्याची शक्यता अधिक आहे .
उषा चौधरी या मागील २५ वर्षांपासून शरद पवार यांच्या पक्षात कार्यरत असून त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस , नागपूर शहर उपाध्यक्ष , वर्धा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस निरीक्षक आदी जबाबदाऱ्या सांभाळत आहेत , ओबीसी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी काम केलेले आहे लोकसभा निवडणुकीत दीपक निकाळजे,माजी आमदार उपेंद्र शेंडे , नारायण बागडे राजेंद्र गवई,बसपाचे तत्कालीन लोकसभा उमेदवार प्रकाश टेम्भूरने आदींना महाविकास आघाडीसोबत आणण्यास चौधरी यांची महत्वाची भूमिका होती .ओबीसी आंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे चौधरी यांच्या या जमेच्या बाजू लक्षात घेता त्यांना ,मागील तीन टर्म मतदारसंघ ताब्यात ठेवणा-या फडणवीसांच्या विरोधात उतरविण्यासाठी काँग्रेसकडून या जागेची अदलाबदल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून चौधरी यांच्या मागे महाविकास आघाडीची ताकद उभी करण्याचा पवारांचा विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेच्या यशानंतर शरद पवार यांनी आता आपले लक्ष्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे वळविले आहे . या निवडणुकीत आपल्या पक्षाचा टक्का वाढविण्यासाठी पवारांनी व्यूहरचं आखण्यास सुरुवात केलेली आहे . राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का देण्यासह पवारांवर सतत टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पवारांनी ६० टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी मधील आक्रमक कार्यकर्त्या आणि पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषा चौधरी यांना रिंगणात उतरविण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे .
No comments:
Post a Comment