प्रफुल चव्हाण इन इंडिया लाईव
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नीलेश काळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने डोंबिवलीतील निवडणुकीचे वातावरण अचानक तापले असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे.

जवळपास 70 वर्षांपासून संघ मतदारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सातत्याने विजयी होत आहेत.आता संघ पार्श्वभूमीचे नीलेश काळे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने संघ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.
त्यामुळे भाजपचे उमेदवार आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवडणूक निकालावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या संदर्भात अपक्ष उमेदवार नीलेश काळे यांनी इन इंडिया लाईव्ह सोबत बोलताना सांगितले कि गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील लोकांचे प्रश्न प्रलंबित असल्यामुळे मला निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी मित्रपरिवाराने सांगितले आहे,
निवणुकीत माझ्या सोबत शहरातील अनेक संघातील मित्रपरिवार असून, मला लोक बहू मतांनी निवडून देतील असे सांगितले,

No comments:
Post a Comment