डोंबिवली - ( प्रतिनिधी ) दिवाळीच्या पर्वावर मातीचे किल्ले बनविण्याची परंपरा कायम राहावी, यासाठी डोंबिवलीतील रुणवाल गार्डन रहिवासी सांस्कृतिक मंडळच्या चिमूकल्यांनी मातीचा आकार देऊन शिवनेरी किल्ल्याची निर्मिती केली आहे, किल्ल्यावर भगव्या पताका रात्रीच्या अंधारात किल्ल्यामध्ये लागणारे दिवे यासह किल्ल्याच्या आत वसलेलं गाव, तिथली संस्कृती असं सर्व चित्रण चिमुकल्यांनी मातीने साकारलं आहे,चिमुकल्यांनी साकारलेली किल्ल्याची कलाकृती ही अतिशय थक्क करणारी आहे,या कल्पक किल्ला स्थळी नक्की भेट द्यावी. या ठिकाणी चिमकुले दोन दिवसांपासून सतत मातीचा वापर करत असून,मातीतून त्यांनी आपल्या कल्पकतेनं किल्ला साकारला आहे, रुणवाल गार्डन कल्चर कमिटीचे अध्यक्ष विक्की हिंगे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि आम्ही हा उपक्रम गेल्या वर्षांपासून राबवत आहोत. विविध प्रकारचे किल्ले या स्थळी निर्माण करण्यात आले आहेत. या वेळेस शिवनेरी छानसा किल्ला निर्माण केला असून, प्रथम,अवधूत, अनिश,कार्तिक,मानस, विस्मय, रुद्रा,आदया, तनय, कार्तिकी, जान्हवी, मिताली, बिर्याना, रमेशदादा, अभिषेकदादा, विशालदादा व सिद्देशदादा यांनी किल्ला निर्माण केला असल्याचे सांगितले आहे

No comments:
Post a Comment