टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - In India Live

Breaking News

06/11/2024

टिटवाळ्यातील महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रफुल चव्हाण इन इंडिया लाईव 

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर, यांच्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात झाली, टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत विश्वनाथ भोईर, यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांची धडाकेबाज कामगिरी आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्याकडून झालेली विकासकामे या जोरावर मतदार आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवतील असा ठाम विश्वास विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला,

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर, यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे दणक्यात उद्घाटन झाले, आज लगेचच विश्वनाथ भोईर, यांनी टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेत आपला निवडणूक प्रचार सुरू केला, यावेळी टिटवाळा मंदिर परिसरापासून वाजत गाजत भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,

No comments:

Post a Comment