नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवर 354 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. - In India Live

Breaking News

07/10/2018

नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवर 354 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Image result for nana patekar , ganesh acharya

निशा पालव,इन इंडिया लाईव.

मुंबई : दि.6 ऑक्टोबर, अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर आणि नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तनुश्रीने तक्रार दाखल केलीय.

नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही तनुश्री दत्ताने केली आहे.मुंबई पोलिसांनी इन इंडिया लाईव शी बोलताना सांगितले की सखोल चौकशी  करुन कोणीही  दोषी आढळल्यास  कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.


तनुश्रीच्या आरोपांवर नानांचं उत्तर

"जे खोटं आहे ते खोटंच आहे" असं सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. 'हाऊसफुल 4' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करुन नाना जैसलमेरहून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावर परल्यानंतर इन इंडिया लाईव ला नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं.

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर पत्रकार परिषद घेण्याच्या प्रश्नावर नाना एवढंच म्हणाले की, "लवकरच घेणार."

दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं.

अभीनेत्री तनुश्री दत्ताचा आरोप

अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे."

'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला.

No comments:

Post a Comment