प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
कल्याण डोंबिवलीत खड्डयामुळे नागरीक त्रस्त आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. अतिशय धक्कादायक म्हणजे कल्याण पूर्वेतील आमदार सुलभा गायकवाड यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरीकांना खडड्यांचा सामना करावा लागत आहे. एका आमदारांच्या घराच्या परिसरात ही परिस्थिती आहे. तर शहराच्या अन्य भागात काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत ४२० किलोमीटर अंतराचे रस्ते आहे. त्यापैकी २० टक्के रस्ते हे सिमेंट का’न्करीटीकरणाचे आहे. उर्वरीत रस्ते डांबरी आहे. पावसाळ्यात दरवर्षी डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात. यंदा आषाढाचा पाऊस ॰ावणात पडला. पावसाने जोर धरल्याने रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली. खड्डयामुळे वाहन चालक आणि नागरीकांसह प्रवाशांना वाहतूक काेंडीचा सामना करावा लागतो. तसेच प्रवाशांचे कंबरडे मोडले जात आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आयुक्तांनी बैठक घेतली. रस्त्यावरील खड्डे गणपती पूर्वी बुजविले गेले नाहीत. तर कंत्राट आणि अधिकारी यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा दिला. मात्र रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नसल्याने आयुक्तांचा इशारा प्रभावी ठरलेला नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे महापालिकेवर नागरीकांसह, वाहन चालक आणि प्रवासी यांच्याकडून रोष व्यक्त केला जात आहे. खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटीची रुपयांची तरतूद करुन देखील त्याचा काही उपयोग नाही. हा पैसा खड्डे बुजविताच खड्ड्यात जाणार का अशी संतप्त प्रतिक्रिया नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनावर टिका केली आहे. गणरायाचे आगमन आणि विसर्जन रस्त्यावरील खड्ड्यातून झाले. किमान ५ ते १० दिवसांच्या विसर्जना आधी रस्ते सुस्थितीत केले जावेत असे आवाहन महापालिका प्रशासनाला केले आहे.

No comments:
Post a Comment