महेश घोलप,इन इंडिया लाइव
मुंबई - मालाड परिसरामध्ये सोमवारी 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या मॉडेल हत्येमुळे खळबळ उडाली होती.पण काही तासांतच तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी आरोपी मुझम्मिल हसनच्या मुसक्या आवळल्या.ओला ड्रायव्हरच्या तत्परतेमुळे पोलिसांना मानसीच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळालं.हा ओला ड्रायव्हर मानसी दीक्षित हत्याकांड प्रकरणातील साक्षीदारदेखील आहे.ज्याच्या गाडीतून मानसाचा मृतदेह असलेली बॅग झाडाझुडपात फेकण्यात आली होती.आरोपी ने खळबळ जनक पोलिसांना माहिती दिली आहे.
बांगुर नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मानसी आणि मुझम्मिल मध्ये मैत्रीचे समंध होते,त्या दोघांची मैत्री इंटरनेट वरून झाली होती,त्या मैत्रीचा फ़ायदा घेत आरोपी ने मानसी ला,अंधेरी (पश्चिम) येथील मित्तल नगर अल-ओहद इमारतीमध्ये बोलावून शारीरिक संबंधाची मागणी केली असता,मानसीने नकार दिल्याने दोघांचा वाद झाला.या वादादरम्यान मुझम्मिलनं लाकडी टेबलावर तिचे डोके जोरात आपटले,यातच मानसीचा मृत्यूझाला.
यानंतर मुझम्मिलनं तिचा मृतदेह बॅगमध्ये कोंबला,आणी ओला कार बुक केली,ड्रायव्हरला एअरपोर्टच्या दिशेनं गाडी नेण्यास सांगितली.मध्येच त्यानं ड्रायव्हरला मालाडमध्ये गाडी थांबवण्यास सांगितली.गाडी थांबल्यानंतर त्यानं झाडाझुडपात बॅग फेकली.
ड्रायव्हरनं पोलिसांना सांगितले की, ज्यावेळेस बॅग उचलण्यास आरोपी मुझम्मिला मदत केली,त्यावेळेस बॅगमध्ये प्रमाणाबाहेर वजन असल्याचे जाणवत होते.पोलिसांनी ड्रायव्हरकडून आरोपी मुझम्मिलचा फोन नंबर घेतला.मोबाइल कंपनीकडून मागवण्यात आलेल्या तपशिलामध्ये आरोपी मुझम्मिल हसनची माहिती प्राप्त झाली.यानंतर त्याचे लोकेशन शोधून केवळ चार तासांत पोलिसांनी त्याला गजाआड केल.

No comments:
Post a Comment