शिवसेना - काँग्रेस आमदार भिडले - In India Live

Breaking News

29/10/2018

शिवसेना - काँग्रेस आमदार भिडले



प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव

नांदेड : दि.29 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस भिडल्याची घटना सोमवारी घडली. बैठकीत अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा ठराव मांडण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केल्याने वाद निर्माण झाला. हा वाद इतका टोकाला गेला की पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोर आमदार अमर राजूरकर आणि आमदार हेमंत पाटील यांच्यात झटापट झाली.

नांदेडमध्ये सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. रामदास कदम पालकमंत्री असले तरी जिल्हा नियोजन समितीत बहुमत काँग्रेसचे आहे. या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा ठराव सभागृहात मांडला. यावर शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतला. तसेच निधीवाटपावरुनही वाद निर्माण झाला. हा वाद  इतका टोकाला गेल की काँग्रेस आमदार अमर राजूरकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात झटापट झाली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

पालकमंत्री नियोजन समिती सदस्यांच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या प्रसंगी दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

No comments:

Post a Comment