महेश घोलप,इन इंडिया लाइव
मुंबई-थाय एअरवेजच्या बँकॉक-मुंबई विमानात शेजारी बसलेल्या महिला प्रवाशाचा विनयभंग केल्या प्रकरणी अंधेरीतील सहार पोलिसांनी चंद्राहास त्रिपाठी याला अटक केली आहे.
विमानाने बँकॉकच्या विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर विमानातील दिवे बंद करण्यात आले. त्यावेळी आरोपीने स्पर्श करुन विनयभंग केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
आरोपी चंद्रहास एमबीए पदवीधर असून एका कंपनीत सेल्स विभागात उच्चपदावर आहे. तक्रारदार महिला मुंबईत वकिली करते.
महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की,कोणीतरी मला स्पर्श करतेय असे जाणवले.माझ्या शेजारी बसलेल्या माणसाने अजाणतेपणी स्पर्श केला असेल, असे समजून मी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतर माझ्या मांडयामध्ये मला स्पर्श जाणवला. आरोपी झोपेचे सोंग घेऊन माझ्या शरीराला स्पर्श करत होता. सदर महिलेने लगेच हा प्रकार क्रू च्या कानावर घातला. त्यांनी आसन बदलायला मदत केली. मुंबईत पोहोचल्यानंतर महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी क्रू कडे मदत मागितली. एअरलाईनच्या क्रू ने सीआयएसएफला बोलवले त्यांनी त्रिपाठीला पोलिसांच्या ताब्यात दिले. चंद्राहास त्रिपाठीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
x

No comments:
Post a Comment