कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यातील तरूणांसाठी मराठी युवा उद्योजक मेळावा २०१८ - In India Live

Breaking News

30/10/2018

कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्यातील तरूणांसाठी मराठी युवा उद्योजक मेळावा २०१८


महेश घोलप , मुंबई

साईदत्त परिवार रांजणवाडी, संघर्ष युवा प्रतिष्ठान, पाचगणी आणि राजे संघर्ष प्रतिष्ठान, तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी युवा उद्योजक मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. रविवारी ४ नोव्हेंबरला सकाळी ९.३० ते ५ पर्यंत हा कल्चर सेंटर प्लॉट २८, सेक्टर १५, कोपरखैराणे नवी मुंबई येथे होईल. तरूणांनी आणि इच्छूक उद्योजकांनी मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडुन करण्यात आले आहे. 

मेळाव्यामध्ये मा. श्री. सुरेश रांजवन (संचालक साईउद्योग समूह), महेश यादव, मा. श्री. योगशेजी पाटणकर , गोविंद सुमन केशवराव डाके आणि गीताराम कदम, प्रशांत जगताप, कुमार तात्यासाहेब, अमोल शेवाळे, कुमार जीवनवार, अमोल पाटील, सचिन पवार आणि दशरथ जाधव इत्यादी उद्योजक सातारा आणि सांगली जिल्ह्यातील तरूणांना मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment