प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2018 चे तिसरे (हिवाळी) अधिवेशन येत्या 19 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरु होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी आज दिली. विधानभवन येथे विधानसभा व विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून या काळात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ विधेयके मांडण्यात येणार आहेत. तर विधानपरिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे बापट यांनी सांगितले, आवश्यकता भासल्यास सुट्टीच्या दिवशी कामकाज चालू ठेवण्यात येईल तसेच अंतिम आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशनाचे दिवस वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, मंत्री विनोद तावडे,एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, डॉ रणजित पाटील,आमदार एकनाथ खडसे, गणपतराव देशमुख, जयंत पाटील, राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विधि मंडळाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे उपस्थित होते.
No comments:
New comments are not allowed.