क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक पुर्ण होण्यास गती द्यावी - In India Live

Breaking News

02/11/2018

क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांचे स्मारक पुर्ण होण्यास गती द्यावी




प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव

मुंबई, दि. 2 : संगमवाडी पुणे येथे प्रस्तावित असलेले क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक संदर्भातील भूसंपादन प्रक्रियेस गती द्यावी ज्यामुळे संबंधित स्मारक लवकरात लवकर पुर्ण होण्यास मदत होईल,असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज दिले.या संदर्भातील 
आढावा बैठक मंत्रालय येथे कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. अतिशय महत्वपूर्ण हे स्मारक असून यासाठीच्या 22 हजार चौ.फू.जागेच्या भूसंपादनासाठी 74 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी 16कोटी 46 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहेत. नियमानुसार 30 टक्के रक्कम जमा करावयाची असल्याने उर्वरित 5कोटी रुपयांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल,असे कांबळे यांनी सांगितले.या बैठकीस पुणे महानगरपालिका,समाजकल्याण आयुक्त कार्यालय पुणे,जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वसतीगृहासाठी जागेचा शोध घ्यावा

पुणे शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहासाठी जागेची आवश्यकता आहे. ही निकड लक्षात घेता तातडीने जागा शोधण्याचे निर्देश कांबळे यांनी दिले. पुणे शहरातील शासकीय तसेच महानगरपालिकेच्या जुन्या शाळा, इमारती यांचा शोध घेऊन त्याठिकाणी हे वसतीगृह तातडीने सुरु करावेत असेही मंत्री कांबळे यांनी यावेळी सांगितले.


No comments: