रेल्वे रुळाला तडे,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - In India Live

Breaking News

27/11/2018

रेल्वे रुळाला तडे,मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रजील मेनन,इन इंडिया लाईव
मुंबई : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत-खोपोली-पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांवर  परिणाम झाला आहे. मंगळवारी (27 नोव्हेंबर) सकाळी 6.15 वाजेदरम्यान ही घटना आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक 1 तास  उशिरानं सुरू आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस हा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

सोमवारी संध्याकाळी टिटवाळा-आंबिवली मार्गावर सिग्नल यंत्रणा फेल झाल्याने प्रवाशांना रात्रीपर्यंत फटका बसला असतानाच मंगळवारीही सकाळी मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

No comments:

Post a Comment