मुंबई - एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.आठवले यांना कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रवीण गोसावी असल्याचे समजते. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी गोसावीला पकडून बेदम चोप दिला, व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अंबरनाथ येथील नेताजी मार्केटमध्ये रामदास आठवले यांच्या आरपी पक्ष्याचा कार्यक्रम होता. आठवले हे स्टेजवरुन उतरत असताना गोसावी हा त्यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने जवळ गेला आणि त्यांच्या कानशिलात लगावली आहे. यानंतर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पाहताच पकडले आणि बेदम चोप दिला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर एकच गोंधळ उडाला असून, परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या गोसावी या तरुणाला आठवले समर्थकांनी बेदम चोप दिला. यानंतर गोसावीला उल्हासनगर येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथमध्ये आयोजित केलेल्या संविधान गौरव दिनानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथमध्ये आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आठवले हे स्टेजवरून उतरत असताना प्रविण गोसावी नावाच्या तरुणाने त्यांच्या कानशिलात लगावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कार्यकर्तेदेखील हतबल झाले होते. मात्र, आठवले यांना सावरल्यावर कार्यकर्त्यांनी प्रविणला बेदम मारहण केली. अंबरनाथ पोलिसांनी हस्तक्षेप करत या प्रविणला ताब्यात घेतले आहे.
अंबरनाथ येथील नेताजी मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संविधान गौरव महोत्सव आयोजित केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती. रात्री दहा वाजता हा कार्यक्रम संपल्यानंतर आठवले कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत स्टेजवरून खाली येत असताना पुष्पहार देण्याच्या बहाण्याने प्रविण त्यांच्या अंगावर धावत गेला. तसेच त्याने जाऊन त्यांच्या कानाखाली लगावली. या प्रकारानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment