प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, दि.१२ डिसेंबर 2018 -भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आलेला शोक प्रस्ताव व विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्व पक्षाच्या नेत्यांनी श्रध्दांजली वाहून पारीत केलेला शोकप्रस्ताव आज शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांनी अटलजींच्या मानसकन्या नमीता भट्टाचार्य व जावई रंजन भट्टाचार्य यांना प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केला. आजपर्यंत असा शोकप्रस्ताव पारीत झाल्यानंतर कुटुंबियांना टपालाने पाठविला जायचा. प्रथमच शोक प्रस्ताव प्रत्यक्ष कुटूंबियांच्या हातात सुपुर्द करण्यात आला.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मा.मुख्यमंत्री यांनी अटलजींना श्रध्दांजली वाहणारा शोकप्रस्ताव बैठकीत सादर केला. त्यावेळी सदर प्रस्ताव टपालाने न पाठविता प्रत्यक्ष कुटुंबियांना भेटून देण्याची सूचना मान्य करण्यात आली. विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात अधिवेशन प्रसंगी सर्व पक्ष नेत्यांनी अटलजींच्या जीवनकार्याचा गौरव करणारी भाषणे करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली व शोकप्रस्ताव पारित केला. दोन्ही सभागृहातील सर्व नेत्यांच्या भाषणांसहीतचा शोकप्रस्ताव आज अटलजीच्या कुटुंबियांना सादर करण्यात आला. याप्रसंगी.डी.के.जैन,मुख्य सचिव, विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे व आमदार आशिष शेलार हे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सोबत होते. सुमारे तासभराच्या भेटीमध्ये अटलजींच्या महाराष्ट्र, मुंबई च्या अनेक आठवणी त्यांच्या मानसकन्या नमिता यांनी जागवल्या.याप्रसंगी जावई रंजन भट्टाचार्य उपस्थित होते. शिवाजी मंदिरात पाहिलेली मराठी नाटक,पं.भीमसेन जोशी, सुधीर फडके अशा प्रथितयश कलाकारांसोबत असलेली त्यांची मैत्री,अटलजींचे मराठीवरचे प्रेम या अनुषंगाने अनेक आठवणी आज गप्पामध्ये निघाल्या. नीतीमुल्य राजकारणाचा अटलजींचा वारसा आजची नवीन पिढी नक्कीच पुढे नेईल,असा विश्वास नमिता भट्टाचार्य यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधीमंडळ यांचे नमिता भटाचार्य यांनी मनापासून आभार मानले. प्रत्यक्ष भेटून शोकप्रस्ताव सादर केलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment