अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदरकराची तुरुंग बदलीसाठी मागणी. - In India Live

Breaking News

13/12/2018

अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदरकराची तुरुंग बदलीसाठी मागणी.


आरोपी अभय कुरुंदकर 
प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव
रायगड - अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदरकर याने तळोजा येथील तुरुंग बदली करण्याबाबत जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला आहे. याबाबत 19 डिसेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी.मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अश्विनी बिद्रे खून प्रकरणाबाबत ११ डिसेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. मल्लशेट्टी यांच्या न्यायलायासमोर सुनावणी सुरू आहे. महेश फळणीकर व कुंदन भंडारी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र, पोलिसांनी एकाही आरोपीला हजर केले नव्हते. तर अभय कुरुंदकर यांच्या मार्फत वकिलांनी तुरुंग बदलीबाबत न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे.
अभय कुरुंदकर यांच्या तुरुंग बदली अर्जावर १९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे जिल्हा सरकारी वकील संतोष पवार यांनी सांगितले. अश्विनी बिद्रे प्रकरणाचा निकाल वर्षभरात लावला जावा,असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच लागेल अशे समजले जात आहे.

No comments:

Post a Comment