आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रयत्नांना यश, लक्षवेधीद्वारे मांडली होती विधानपरिषदेत सूचना - In India Live

Breaking News

12/12/2018

आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रयत्नांना यश, लक्षवेधीद्वारे मांडली होती विधानपरिषदेत सूचना

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, दि. १२ : मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविका लावण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारप्रकाश गजभिये हे मागील काही वर्षांपासून करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. यासंदर्भात आज आमदार प्रकाश गजभिये यांच्या विनंतीवरुन सामान्य प्रशासनविभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह संबंधीतअधिकाऱ्यांकडून मंत्रालयात जागेची पाहणी करुन जागा निश्चित करण्यात आली. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा,असे निर्देश यावेळी राज्यमंत्री येरावार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. प्रस्ताव तातडीने मान्य करुन येत्या २६ जानेवारी २०१९ रोजी प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचे तैलचित्र आणि संविधानाच्याप्रास्ताविकेचे उद्घाटन करण्यात यावे,अशी मागणी यावेळी आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मलीक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव ए. ए.सगणे, सहसचिव श्रीमती वडते, मुख्यवास्तुरचनाकार श्रीमती देशपांडे, अभियंता रेश्मा चव्हाण, आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रविण भोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविका लावण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये म्हणाले की,समाजातील दीन, दलीत, दुर्बल, वंचित घटकांसाठी बाबासाहेबांचे कार्य फार मोठे आहे. याशिवाय संविधानाने समाजातील सर्व घटकांना समता, न्याय आणि बंधुत्वाचीशिकवण दिली आहे. त्यामुळे लोकांच्या आकांक्षांचे प्रमुख ठिकाण असलेल्या मंत्रालयात बाबासाहेबांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविका असणे अत्यंत गरजेचेआहे. यातून लोकांना मोठी प्रेरणा मिळत राहील, असे आमदार श्री. प्रकाश गजभिये यांनी यावेळी सांगितले.
 विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडून  आमदार प्रकाश गजभिये यांनी या प्रश्नावर विधानपरिषदेत चर्चाघडवून आणली होती. बाबासाहेबांचे तैलचित्र आणि संविधानाची प्रास्ताविका मंत्रालय इमारतीमध्ये तातडीने लावण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्यामागणीस सकारात्मक प्रतिसाद देत सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंत्रालयात यासाठी लवकरात लवकर जागा निश्चित केली जाईल, असेविधानपरिषदेत सांगितले होते. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक घेऊन आणि त्यानंतर जागेची पाहणी करुन जागा निश्चित करण्यात आली व त्वरीत प्रस्ताव मंजुरीसाठीमा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले.

No comments:

Post a Comment