TikTok मोबाईल ऍपवर मद्रास उच्च न्यायालयाचे बंदीचे आदेश - In India Live

Breaking News

04/04/2019

TikTok मोबाईल ऍपवर मद्रास उच्च न्यायालयाचे बंदीचे आदेश


संघर्ष गांगुर्डे, इन इंडिया लाईव
मुंबई, दी. 4 TikTok हे एक चीनचे अ‍ॅप असून आक्षेपार्ह व्हिडिओंना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयात टीकटॉकविरोधात एक याचिक दाखल करण्य़ात आली होती. यामध्ये म्हटले होते की, जी मुले या अ‍ॅपचा वापर करतात, ती यौन उत्पिडनसंबंधी व्यक्तींच्या संपर्कात आरामात येऊ शकतात. असे बरेच व्हिडिओ TikTok वर व्हायरल होत आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर न्यायालयाने आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे TikTok चा वापर करणे धोक्यापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. 
TikTok हे अ‍ॅप बिजिंगची कंपनीने बनविले आहे. यावर युजर आपले छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. भारतात हे अ‍ॅप खूपच लोकप्रिय झाले आहे. या अ‍ॅपद्वारे बॉलिवूडचे डायलॉग, जोक्सवर युजर व्हिडिओ बनवितात. तसेच लिप-सिंकसह लोकप्रिय संगितावर डान्सचेही व्हिडिओ टाकले जातात. 
प्रसारमाध्यमांशी बोलताना तामिळनाडूच्या माहिती प्रसारण मंत्र्यांनी सांगितलेले की या अ‍ॅपवर काही कंटेंट पाहण्यालायक नसतो. भाजपाशी संबंधीत एका संघटनेनेही या अ‍ॅपवर बंदी आणण्याची मागणी केली होती. याच्या उलट भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी सांगितलेले की, पक्षाने काही TikTok व्हिडिओ पाहिले, हा चांगला क्रिएटीव्ह प्लॅटफॉर्म आहे.

No comments:

Post a Comment