संघर्ष गांगुर्डे,इन इंडिया लाईव
दि.३ जून जागतिक सायकल दिनानिमित्त आज कल्याणमध्ये पर्यावरण विषयक जागरुकता निर्माण होण्याहेतू सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते, हि रॅली आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी केमिस्ट & ड्रगिस्ट, डॉक्टर्स, फार्मसीस्ट स्र्टुडंर्ट फाउंडेशन व कल्याण सायकलीस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. प्रदूषण मुक्त व निरोगी कल्याण हे या सायकल रॅलीचे मुख्य उद्दिष्ठ होते. या सायकल रॅलीचे नेतृत्व स्वतः आमदार नरेंद्रजी पवार यांनी केले. त्यागोदर त्यांनी सर्व कल्याणकरांना सायकलीचा वापर छोट्या अंतरासाठी करावा हे आव्हान त्याप्रसंगी केले जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.
सायकल चालवल्यामुळे आपले शरीर सुद्धा तंदृस्त व निरोगी राहते. याप्रसंगी रोज किमान पाच किलोमीटर सायकल चालवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. सायकल रॅलीची सुरवात वसंत व्हॅली पासून सुरवात होऊन आधारवाडी, दुर्गाडी, सहजानंद चौक, शिवाजी चौक, स्टेशन परिसर, प्रेम ऑटो, खडकपाडा, मार्गे पुन्हा वसंत व्हॅलीला या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीला भारतीय जनता पार्टी केमिस्ट & ड्रगिस्ट, डॉक्टर्स, फार्मसीस्ट स्र्टुडंट फाउंडेशनचे राष्ट्रीय संयुक्त अध्यक्ष तुषार मोरे, डॉ.श्याम पोटदुखे, डॉ.गांगण, डॉ.महेश गोसावी, किरण गोसावी, बळीराम रोकडे, स्नेह्काश जोशी, प्रफुल्ल महाडिक, प्रताप टूमकर, यांची उपस्थिती होती.तसेच कल्याण सायकलीस्ट ग्रुपचे डॉ.अद्वैत जाधव, यांचेही मार्गदर्शन लाभले, या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष.भगवान म्हात्रे, व वैद्यकीय आघाडी सेलचे .प्रकाश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.


No comments:
Post a Comment