प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
भाजपात घेण्यासाठी मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना रोज सतत फोन करत आहेत असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.इतकंच नाही तर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजपातले इतर नेते करत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे.
एवढंच नाही तर राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे. एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना हा आरोप करणं हे धक्कादायक आहे.या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि अहमदनगरमधून ते भाजपाच्या तिकिटावर खासदारही झाले. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील हेदेखील भाजपात जाणार हे नक्की झाले आहे.अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला भाजपात येण्यासाठी फोन करत आहेत असा खळबळजनक आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे.एवढंच नाही तर राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी होऊन दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार काय ?याबाबत तर्क लढवले जात आहेत.वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना आम्ही सोबत घेण्यासंबंधी विचार करतो आहोत. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही करू मात्र अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे

No comments:
Post a Comment