कलात्मकतेला चालना देण्यासाठी मुंबईत रंगला ‘फॅशनिस्टा २०२० - In India Live

Breaking News

28/01/2020

कलात्मकतेला चालना देण्यासाठी मुंबईत रंगला ‘फॅशनिस्टा २०२०

प्रफुल चव्हाण,इंडिया लाईव्ह
मुंबई दि. 26 आपल्या शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांना सतत अनुभवातून शिक्षण देणाऱ्या केटीआय शैक्षणिक संस्थेतर्फेे यंदा फॅशन क्षेत्रावर आधारित ‘फॅशनिस्टा’ या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यंदा या फॅशन शो चे हे ५ वें वर्ष होते. या कार्यक्रमात फॅशन डिझाइनिंगच्या विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला व क्रियाशीलतेला उत्तेजन देऊन व्यापक प्रमाणात व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी शहरी आणि ग्रामीण विद्यर्थिनींसाठी केटीआयने ही एक संधी उपलब्ध करून दिली अशी माहिती केटीआय चे कार्यकारी अध्यक्ष मकरंद वागासकर यांनी दिली.
दादर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ३८ विद्यार्थिनींनी त्यांच्यातील नवनिर्मितिक्षमता व सृजनशीलता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यंदा झालेल्या ‘फॅशनिस्टा’ २०२० या कार्यक्रमात ‘पिकॉक’ संकल्पनेवर आधारित फॅशनची  जबरदस्त चमक प्रेक्षकांना पहायला मिळाली. या फॅशन शो मध्ये बोरिवली शाखेची विद्यार्थिनी अफसाना काझी हिने प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. दुसरा क्रमांक इंडो वेस्टर्न संकल्पनेवर आधारित दादर शाखेची विद्यार्थिनी विनिता राठोड हिने पटकावला. तर तृतीय क्रमांक मिळवत सूर्यास्त संकल्पनेवर आधारित बोरिवली शाखेच्या श्वेता विश्वकर्मा हिने बाजी मारली. या शो मध्ये केटिआय च्या संपूर्ण महाराष्ट्रातील शाखेतील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
या उपक्रमाविषयी माहिती देताना वागासकर यांनी सांगितले की, “१९६७ साली स्थापन झालेली कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (केटीआय) ही व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. सरकारमान्य व उद्योगांना  आवश्यक असणारे कौशल्य देऊन भारतातील युवाशक्तीला सामर्थ्यवान करणे हे  केटीआयचे स्वप्न आहे. उदरनिर्वाह आणि रोजगार यांवर लक्ष केन्द्रित करणारे उच्च गुणवत्तेचे शिक्षण देऊन केटीआय या स्वप्नाकडे वाटचाल करीत आहे असेही वागासकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment