प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह
मुंबई: दि,५.देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातला आहे मोठ्या प्रमाणात पुणे शहर याचा रेड झोन मध्ये समावेश झाला आहे. त्याच प्रमाणे आरोग्य व्यवस्थेवर ही प्रचंड ताण पडला आहे परिणामी आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागते. देशातील सर्वाधिक गंभीर कोरोनाग्रस्त शहर म्हणजे पूणे. याच पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या परिचारिका सुजाता शिंदे ह्या १५ वर्षांपासून आरोग्य विभागात कार्यरथ आहेत.दिड वर्षाचे बाळ असलेल्या सुजाता शिंदे यांचे सासर औरंगाबाद, नवजात बाळ,सासू,सासरे व पतीसह त्या औरंगाबादेत रहायच्या.परंतु सध्या नोकरीनिमित्त त्या पुण्यातच राहतात.

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि सुजाता शिंदे स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलाला भेटण्यापेक्षा इतरांच्या मुलांना कोरोनापासून वाचविण्यासाठी सेवाधर्माचा यज्ञ सुरू केला.रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा मानणार्या सुजाता शिंदे या अतिदक्षता कक्षातील कोरोनाबाधीत रुग्णांसाठी प्रत्यक्षात देवदूत म्हणून धावून आल्या.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर काही दिवसांनी एप्रिलच्या रविवारी मन की बात करताना पुण्यातील परिचारिकां व डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.त्यानंतर पुण्यातील परिचारिकांची जबाबदारी अधिकच वाढली होती. तसे पाहता पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच होती.परिणामी जगप्रसिद्ध ससून रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सर्व बेड झपाट्याने फुल्ल झाले. या ससून रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात कोरोना बाधित रुग्णांची सेवा करताना परिचारिका उच्चशिक्षित सुजाता शिंदे ह्या लहान बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना कोरोना महामारी आजाराचे ज्ञानदान करत अनेकांना धीर देत होत्या,व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करून, प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देत असत,सर्वसामान्य लोकांसोबत आपुलकीचे नाते जोपासत त्या आरोग्य सेवेच्या कार्यात सतत रुगण्यास सेवा देण्यासाठी तत्पर होत्या.त्याच बरोबर सखोल ज्ञानाचे भांडार असल्याने त्या नेहमी लोकांना रुग्णालयात होणाऱ्या आरोग्यसमस्यांची जाण वरिष्ठांना करून देत असतात.

कोरोना बाधित रुग्णाची सेवा करताना कोणताही बाधा ठरू नये म्हणून गेले १५ दिवस त्यांना Quarantine केले दि. ०१ मे रोजी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना काही दिवसांसाठी सुट्टी मिळाल्याने त्या कर्तव्य बजावून पुण्यातील वास्तूश्रीअद्रीना सोसायटी केशव नगर मंजिरी रोड येथील घरी आल्यानंतर प्रवेशद्वारा जवळ पुष्पवर्षाव आणि आरती ओवाळून नागरिकांनी मोठ्या हर्षउल्हासाने स्वागत केले. आणि यांच्या बद्दल आपली कृतज्ञाता व्यक्त करताना दिसले. सुजाता शिंदे आपल्या दीड वर्षाच्या बाळाला औरंगाबाद येथील सासुसासऱ्या कडे ठेवून आपले कर्तव्य बजावत आहेत, यांच्या या कामगीरी मुळे सर्वत्र कौतुकाचे वर्षाव केलं जातं असल्याचे दिसून येत आहे
No comments:
Post a Comment