अन्न,नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह,कार्यालय एक आठवडा बंद - In India Live

Breaking News

12/09/2020

अन्न,नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात ६ अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह,कार्यालय एक आठवडा बंद

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह 

मुंबई,,दि.१२ सप्टेंबर: राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे.


कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे स्वतः होम क्वारंटाइन झाले असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळल्यास कोरोना तपासणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment