माथेरान दी. ४ नोव्हेंबर रोजी माथेरान मधील मिनिट्रेन शटल सेवेला प्रारंभ झाला.त्यावेळेस फक्त अप आणि डाऊन मार्गावर दोन दोन फेऱ्या होत होत्या.त्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असून आज पासून अप व डाऊन मार्गावर आता चार चार फेऱ्या होणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अमन लॉज-माथेरान मिनिट्रेन सुरू झाल्यानंतर माथेरान मध्ये पर्यटक संख्या काही प्रमाणात वाढली असून दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटक वाढण्याची शक्यता असून येथील पर्यटन आनंदात जावे यासाठी येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मिनिट्रेन शटल सेवेच्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी मध्य रेल्वे कडे केली होती.ती मागणी मान्य करत मध्य रेल्वे प्रशासनाने फक्त शनिवार व रविवारसाठी माथेरान ते अमनलॉज चार फेऱ्या आणि अमनलॉज ते माथेरान चार फेऱ्या अश्या एकूण आठ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतल्याने माथेरान मधील पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
यामध्ये द्वितीय श्रेणीच्या 3 प्रथम श्रेणीची 1 आणि मालवाहू 2 बोगीची संरचना करण्यात आली असून बोर्डिंग किव्हा प्रवासादरम्यान गंतव्यस्थानी कोविड 19 चे सर्व निकषांचे पालन करावे लागतील असे आवाहन ही या मध्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
-------------------------------------------------------------------
नवीन वेळापत्रक
माथेरान स्थानकातून :-सकाळी 9:30,10:20 दुपारी 3:10 आणि दुपारी 4:00 वाजता
अमनलॉज स्थानकातून:-सकाळी 9:55,10:45 दुपारी 3:35 आणि 4:25 वाजता
No comments:
Post a Comment