अजय कदम,माथेरान
दि.१० माथेरानच्या हक्काचे पाणी स्थानिकांना विश्वासात न घेता तसेच नगरपालिकेचा नाहरकत दाखला न घेता एमजेपी ने नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील बुर्हानी पार्क या उच्चभ्रू सोसायटीला दिले.भविष्यात माथेरानला याचा फटका बसून पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते.हे कनेक्शन एमजेपी ने तात्काळ हटवावे.यासाठी माथेरान मनसे शहरप्रमुख संतोष कदम यांनी उपोषणाचे हत्यार उपसले.दोन दिवस चाललेले उपोषण मनसे च्या डरकाळीने एमजेपी ने रात्री उशिरा काढल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले.
७ जानेवारी पासून मनसेचे शहराध्यक्ष संतोष कदम उपोषणास बसले होते.त्याच संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांचे रक्तदाब तपासले असता तो वाढला होता.तरीही कदम हे निर्णयावर ठाम होते.दुसऱ्या दिवशी सकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,खालापूर तालुका अध्यक्ष सचिन कर्णिक,सचिव अभिजित घरत, कर्जत तालुका प्रमुख समीर चव्हाण,नेरळ शहराचे माजी सरपंच अंकुश शेळके यांनी माथेरानकडे धाव घेतली.त्यांच्या सोबत ३० ते ४० कार्यकर्ते देखील होते.दरम्यान एमजेपीचे कार्यकारी अभियंता व्ही.सुर्यवंशी तसेच उपविभागीय अभियंता प्रवीण बिर्ला यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली.त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही हे कनेक्शन तात्पुरते काढतो.कारण शासन आदेश आहे. यावर संतोष कदम हे उत्तरावर समाधानी नसल्याने त्यांनी उपोषण सोडले नाही.मग जितेंद्र पाटील यांनी सर्व हकीकत राज ठाकरे यांना मोबाईल वरून दिली.आणि मग सर्व चक्र फिरले.जितेंद्र पाटील हे इथेच न थांबता त्यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पी.ए. ला घटनेची हकीकत सांगितली त्यानुसार संध्याकाळी साढे सात वाजता अधिकाऱयांना आदेश मिळत गेले.त्यानुसार येथील महसूल विभागाचे लिपिक मल्लू राठोड, येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे,मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील व त्यांचे सहकारी आणि एमजेपीचा कर्मचारी वर्ग तसेच माथेरान शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,योगेश जाधव,प्रदीप घावरे,तसेच म न सैनिक रवींद्र कदम व संतोष केळगणे यांनी रात्री दहा वाजता जुमापट्टी येथील पंपिंग हाउस येथे जाऊन बुर्हानी पार्क चे कनेक्शन काढून टाकले.व रात्री ११ वाजता जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिहर महेता,अरविंद शेलार,जनार्दन पार्टे, माथेरान मधील महिला आशाताई कदम,वर्षा शिंदे, सुहासिनी शिंदे यांच्या हस्ते सरबत घेऊन हे उपोषण सोडले.

Hard Rock Hotel & Casino Tunica, MS - Mapyro
ReplyDeleteFind Hard 부천 출장안마 Rock Hotel & 논산 출장샵 Casino Tunica, 의왕 출장샵 MS, United States, ratings, 김해 출장마사지 photos, prices, expert advice, traveler reviews and tips, and more information 하남 출장안마 from