अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा आमदार विश्वनाथ भोईर यांची ची मागणी - In India Live

Breaking News

29/12/2020

अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा आमदार विश्वनाथ भोईर यांची ची मागणी


प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव्ह

मुंबई- दि, 29 कल्याण डोंबविली महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या अभय योजनेचा लाभ शहरातील सर्वसामान्य नागरिक कामगार वर्ग व करदाते यांना अधिकाधिक मिळावा यासाठी अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी कल्याण चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त. डॉ.विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे केली आहे. आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात आमदार भोईर यांनी सामान्य नागरिकांची व्यथा मांडत अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी केली आहे. कोरोना काळात लॉक डाऊन मुळे अनेकांना आर्थिक मंदीची झळ बसली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने तसेच व्यवसायही ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. कुटुंबाच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करताना नाकी नऊ निघत आहेत. त्यामुळेच अभय योजनेचा कालावधी वाढवल्यास सामान्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळेल अशी आशा आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment