मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी, मंदार पारकर तर कार्यवाह पदावर, प्रमोद डोईफोडे निवडून आले आहेत - In India Live

Breaking News

30/01/2021

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी, मंदार पारकर तर कार्यवाह पदावर, प्रमोद डोईफोडे निवडून आले आहेत


प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव्ह 
मुंबई, दि.३० मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची द्वैवार्षिक निवडणूक शुक्रवारी २९ जानेवारी रोजी पार पडली.
या निवडणुकीत मंदार पारकर ७२ मते मिळवून वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. उपाध्यक्षपदी महेश पावसकर, कार्यवाहपदी प्रमोद डोईफोडे तर कोषाध्यक्षपदाची निवडणूक अनिर्णित झाल्याने नेहा पुरव आणि प्रवीण राऊत हे एक एक वर्षासाठी या पदावर कार्यरत राहणार आहे. मंत्रालय आरि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत एकूण १६२ जणांनी मतदान केले. 
या निवडणुकीत कार्यकारिणी पदासाठी झालेल्या निवडणुकीत हरिसिंग राजपूत, अशोक अडसूळ, सोनू श्रीवास्तव, राजू झनके, मिलिंद लिमये हे विजयी झाले आहेत. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष दिलीप सपाटे यांना ६२ मते तर मंदार पारकर यांना ७२ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत महेश पावसकर यांना ४६, संजय बापट यांना ४४ मते मिळाली.  कार्यवाहपदासाठी प्रमोद डोईफोडे यांना ८९ तर प्रवीण पुरो यांना ६९ मते मिळाली. त्याचप्रमाणे कोषाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत नेहा पुरव आरि प्रवीण राऊत यांना प्रत्येकी ७५ पदे मिळाली आहेत

No comments:

Post a Comment