मुंबई दि. २९ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. ऊ. वगळून ) रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उच्च अधिकाऱ्यां समवेत नुकताच वांद्रे (पूर्व ) येथील शासकीय वसाहतीतील समस्यांबाबत नुकतीच आढावा बैठक पार पडली.अधिक माहितीनुसार वांद्रे
(पूर्व )येथील शासकीय वसाहतीतील इमारती जीर्ण झाल्या असल्याने या बाबीची दखल घेत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वांद्रे शासकीय वसाहतीतील एकूण ३०२ इमारती पैकी २६९ इमारतीचे संरचनात्मक परीक्षण पूर्ण झाले असून उर्वरित ६३ इमारतींचे संरचनात्मक परीक्षण प्रगतित असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. सदर बाबत उर्वरित इमारतींचे संरचनात्मक परीक्षण १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना माननीय मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. त्याच प्रमाणे सदर संरचनात्मक परीक्षणात मोठ्या प्रमाणात निवासस्थाने धोकादायक आढळून आल्याने निवासस्थानधारकांची पर्यायी व्यवस्था करण्याकरिता अर्थसंकल्पीय निधीतून २०१२ निवासस्थाने बांधण्याचे काम प्रगती पथावर असून यापैकी ५३२ निवासस्थाने ही ऑक्टोबर २०२२ पर्यंत उपलब्ध होणार आहे. २५६ निवासस्थाने डिसेंबर २०२२ , ४३६ निवासस्थाने मार्च २०२३ पर्यंत, २५६ निवासस्थाने ऑगस्ट २०२३ पर्यंत तर डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत उर्वरित ५३२ निवासस्थाने सदनिका उपलब्ध होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या अनुषंगाने सदर बांधकामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे येत्या काळात वांद्रे वसाहतीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.
Truly impressed by the comprehensive insights shared in this blog. Minister Ravindra Chavan's dedication to resolving the issue of dangerous government buildings in Bandra is commendable and a significant step towards ensuring public safety and welfare!
ReplyDelete