Additional Police Commissioner : पोलीसानी अमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी- अपर पोलीस आयुक्त यांचे आदेश - In India Live

Breaking News

17/10/2023

Additional Police Commissioner : पोलीसानी अमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी- अपर पोलीस आयुक्त यांचे आदेश

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव 
ठाणे,दि.१७-अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर व मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत:समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत असतात. यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची स्थापना केलेली आहे. 

ठाणे जिल्हयामध्ये या समितीचे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह हे अध्यक्ष आहेत. नुकतीच या समितीची बैठक पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे शहर येथे ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

या बैठकीस ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.पंजाबराव उगले, ठाणे शहर पोलीस उपायुक्त गुन्हे  शिवराज पाटील, अन्न व औषध प्रशासन, ठाणे सहाय्यक आयुक्त. रा.प.चौधरी, राज्य उत्पादन शुल्क, विभाग, ठाणे.  राजेंद्र शिरसाठ, जिल्हा सामान्य रूग्णालय, ठाणे डॉ. विजय साळुंखे हे सदस्य तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावीत अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे हे हजर होते.

या बैठकीत अपर पोलीस आयुक्त, गुन्हे यांनी बंद रासायनिक कंपन्यांबाबत तपासणी करणे, मेडिकल स्टोर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कफ सिरपची तसेच गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास कारवाई करावी, एनडीपीएस संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणे, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी गांजा व खसखस यांची लागवड होत असल्यास जिल्हा कृषी अधिकारी यांनी स्थानिक पोलीस किंवा अमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करावी, पोस्ट अधिकारी व खाजगी कुरियर कंपनी यांनी संशयित पार्सल किंवा कुरियर आढळून आल्यास स्थानिक पोलीस किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाशी समन्वय साधून कारवाई करण्याबाबत, लोकांमध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचे व सर्व संबंधितांनी अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले आहे.

दि. ०१ जानेवारी ते १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत गांजाबाबतच्या 39 केसेस दाखल झाल्या असून 1 कोटी 16 लक्ष 46 हजार 518 रुपये किंमतीचा 739 किलो 827 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे, आतापर्यंत यासोबत एकूण 53 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
चरसबाबतच्या 6 केसेस दाखल झाले असून 72 लक्ष 74 हजार रुपये किंमतीचा 8 किलो 183 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
कोकेन बाबतच्या 02 केसेस दाखल झाले असून 58 लक्ष 80 हजार रुपये किंमतीचा 147 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 03 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मोफेड्रॉनबाबतच्या 29 केसेस दाखल झाले असून 64 लक्ष 92 हजार 870 रुपये किंमतीचा 1 किलो 585 ग्रॅम 88 मि.ग्रॅ. मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत यासोबत एकूण 48 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
एलएसडी पेपर बाबतच्या 1 लक्ष 20 हजार रुपये किंमतीचा - 22 ग्रॅम वजनाचे एल.एस.डी 15 नग, इतर गोळ्या व सिरप - 3 हजार 719 कफ सिरप बॉटल जप्त करण्यात आल्या आहे.आतापर्यंत यासोबत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेरोईनबाबत 01 केस दाखल झाले असून 65 हजार रुपये किंमतीचे 13 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले आहे.आतापर्यंत यासोबत एकूण 01 आरोपीस अटक करण्यात आली आहे. 
सेवनार्थीच्या 577 केसेस दाखल करण्यात आल्या असून अशा प्रकारे एकूण 3 कोटी 68 लाख 86 हजार 698 रुपये किंमत असलेले विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून यात आतापर्यंत एकूण दाखल झालेल्या 663 गुन्ह्यांमध्ये एकूण 771 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे, ठाणे शहर. संजय शिंदे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment