प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
नाशिक : दी १६. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या ज्या ऐतिहासिक भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली,त्या भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे महापालिकेने सुप्रीम कोर्टातला खटला जिंकला आहे.या संदर्भातली माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मध्यमांशी बोलताना दिली आहे.
भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता.त्याचा खटला सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. भिडे वाडा वास्तूचे मालक पुन्हा मर्चंट बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांच्याशी चर्चा करून त्याविषयीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता.विजय ढेरे यांनी अनुकूल प्रतिसाद दिला होता.
त्यानंतर सुप्रीम कोर्टातली केस राज्याचे महाधिवक्ता बिरेन्द्र सराफ यांनी लढवली.सुप्रीम कोर्टाने भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यास मान्यता दिली असून पुणे महापालिकेला अनुकूल निकाल दिला आहे.त्यामुळे भिडे वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाच्या दृष्टीने विकासाचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
No comments:
Post a Comment