Subhash Ghai felicitated Minister Mungantiwar : हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी केला, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार - In India Live

Breaking News

21/10/2023

Subhash Ghai felicitated Minister Mungantiwar : हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी केला, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव 
मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात येणार ही साधी बाब नसून त्यासाठी वाघासारखं काळीज आणि हिंमत असणाऱ्या१ सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला हा आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे", असे गौरवोद्गार भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक श्री. सुभाष घई यांनी आज येथे काढले.

हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी ज्येष्ठ निर्माते  श्री. सुभाष घई यांच्या हस्ते शनिवारी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्णकुटी या शासकीय निवासस्थानी येवून हृदय सत्कार केला. याप्रसंगी सुप्रसिद्ध  अभिनेते जॅकी श्रॉफ, निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते शरद केळकर, अभिनेते संदीप कुलकर्णी, अभिनेते विजय पाटकर, अभिनेते भारत गणेशपुरे, चित्रपट वितरक समीर दीक्षित, अभिनेतते  सौरभ गोखले, अभिनेत्री मेघा धाडे, बिग बॉस विजेते शिव ठाकरे, निर्माते  संदीप घुगे यांच्यासह सिने सृष्टीतील नामवंत लोक उपस्थित होते. 

सुभाष घई म्हणाले, सुधीरभाऊ यांची कामाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे; ते कामात स्वतःला झोकून देतात, एका हाताने नाही तर दोन्ही हाताने अतिशय गतीने काम करतात. अभिनेते जॅकी श्रॉफ त्यांच्या खास शैलीत बोलताना म्हणाले सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाची शैली आणि हातोटी खास आहे; त्यांना ती दैवी देणगी आहे. विजय पाटकर यांनी असा सांस्कृतिक मंत्री गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा महाराष्ट्राला लाभलाअसे सांगून  निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, वितरक आणि प्रेक्षक या सर्वांचा विचार करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे निर्णय घेणारा मंत्री म्हणजे सुधीर मुनगंटीवार आहेत अशा भावना व्यक्त केल्या. 

अभिनेते सौरभ गोखले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आणि प्रेरणा आहे, छत्रपतींचं नाव घेवून व्यवसाय करणारे खूप आहेत मात्र त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून कामं करणारी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखी माणसं मात्र कमी आहेत, सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रासाठी ही मोठी कामगिरी केली आहे. चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते शरद केळकर यांनी वाघनखे येणार ही कल्पनाच स्फुरण देणारी असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले पाहिजे असे मत व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून उत्तम कार्य करण्याचे भाग्य लाभले  : ना. मुनगंटीवार 
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हा सत्कार आणि अभिनंदन कार्यक्रम मला ऊर्जा आणि अधिक उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. अनेक चांगली कामे करण्याचे सौभाग्य मला लाभले. लंडनहून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प हा त्याचाच एक भाग्य आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाच्या कबरी भोवति असलेले अतिक्रमण काढणे, प्रतापगडातील भवानी मातेच्या मंदिरातील चांदीचे छत्र तयार करणे, पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा नक्कीच मला बळ देणाऱ्या आहेत याची मला जाणीव आहे. 
ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, भारतीय सिनेसृष्टीला अतिशय चांगला इतिहास आहे; विशेषतः दादासाहेब फाळके या मराठी माणसाने भारतात सिनेमा घडवला यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला अभिमानाचा विषय आहे.

सिनेमाचा समाजावर थेट प्रभाव पडतो, त्यामुळे जबाबदारी अधिक आहे. सुदैवाने आपण संस्कृती आणि संस्कार जपणाऱ्या देशाचे नागरिक आहोत. आपला सिनेमा अजूनही ते जपतोय;  विदेशातही भारतीय सिनेमाचं कौतुक होतं. येथील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक गुणवान आहेत, त्यांच्यात क्षमता खूप आहे. मी त्यांच्या पाठीशी कायम उभा राहीन. चित्रीकरण करण्यासाठी शुल्क लागू नये, विविध परवानग्या मिळविणे सोपे व्हावे यासाठी एक खिडकी योजना, वन विभागाच्या माध्यमातून सर्वोत्तम "लोकेशन" देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. भारतात उत्तम व दर्जेदार चित्रपट निर्माण व्हावेत यासाठी आपण पुढे या सरकार तुमच्या सोबत आहे असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment