प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
डोंबिवली: विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी सोमवार 28 तारखेला रथावर आरुढ होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले होते.डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील गावदेवी मंदिर येथे देवीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. यावेळी त्यांचे पिताश्री तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे , माजी आमदार तथा कल्याण ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे तात्या माने, अभिजित सावंत, प्रमोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदू मालणकर, लालबावटा आणि कम्युनिस्ट पक्षाचे तालुकाप्रमुख काळू कोमास्कर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (, शरद पवार गट )चे भाऊ पाटील,
दीपेश म्हात्रे यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे आणि त्यांचे कुटुंब यावेळी उपस्थित होते.रॅलीत जेष्ठ महिला-पुरुषांसह शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक रॅलीत सहभागी झाले होते. रॅली सम्राटचौक मार्गे दीनदयाळ रोडवरून हॉटेल द्वारकाचौक मार्गे कोपरब्रिज पार करून डोंबिवली पूर्वेत आली. पूर्वेतून केळकर रोड मार्गे इंदिरा चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुढे मानपाडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांना नतमस्तक झाले. त्यानंतर फडके रोड मार्गे गावकीच्या श्रीगणेश मंदिरात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन डोंबिवली विधानसभा क्षेत्र निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवली शहरचा उद्देश असून मला कोणावरही टीका करायची नाही असे सांगितले.

No comments:
Post a Comment