उप सभापती डॉ नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक - In India Live

Breaking News

26/03/2025

उप सभापती डॉ नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक

प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव 
मुंबई दि,२६ समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी  भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानांतर्गत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गो-हे यांच्या विधानभवन कक्षात आज भेट घेण्यात आली.समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या एक वही एक पेन अभियानाचे यावेळी डाॅ .गो-हे यांनी कौतुक केले.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाप्रती असलेली भूमिका लक्षात घेता चळवळीत काम करणा-या समाजसेवकांनी राज्यात ठिकठिकाणी  हे अभियान राबवावेअसे आवाहन देखील त्यांनी केले.यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे ,उपनेते राहुल लोंढे, अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार, समाजभूषण राजू झनके, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार खंडूराजगायकवाड, जेष्ठ,पत्रकार, समाजभूषण नासिकेत पानसरे, जेष्ठ पत्रकार जासंग बोपेगावकर,महेश पावसकर व मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकार प्रफुल चव्हाण हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment