उप विभागीय अधिकारी निलंबित, कठोर कारवाईची घोषणा - In India Live

Breaking News

04/07/2025

उप विभागीय अधिकारी निलंबित, कठोर कारवाईची घोषणा

   
इन इंडिया लाईव, प्रफुल चव्हाण
मुंबई- दि.४ संगमेश्वर जि.नाशिक येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी भूमाफियांविरोधात कडक कारवाई होणार असून, संबंधित उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले असून. त्यांच्यावर महिन्याभरात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल,अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. बावनकुळे म्हणाले, सदर जमीन बिनशेती परवानगी, शासकीय मोजणी, व नजराणा न भरता विकली गेली. तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असतानाही १६ तुकडे करण्यात आले आहेत.
तसेच २५८ दस्त नोंद करण्यात आले असून, मुद्रांक अधिकारी घुरके, गावित, गुप्ते, हिरे, कळसकर यांनी अनधिकृतपणे २०१३ पासून आठ मुद्रांक अधिकाऱ्यांनी चुकीच्या नोंदी केल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर विभागीय चौकशी करून कारवाई केली जाईल.
मालेगाव येथील स्टॅम्प वेंडर झाकीर आणि आरीफ अब्दुल लतीफ व त्यांच्या साथीदारांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल व सात दिवसांत प्राथमिक चौकशी करून अधिवेशनपूर्वी सभागृहास याबाबत माहिती देण्यात येईल.असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे

No comments:

Post a Comment