प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाईव
मुंबई. दि.८ कल्याण बैल बाजार परिसरातील अवंतरा स्पा सेंटर मध्ये मसाज च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या स्पा सेंटरवर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धाड टाकून कारवाही केली आहे
कल्याणच्या बैल बाजार परिसरात एका उच्चभ्रू इमारतीत अवंतरा स्पा मसाज सेंटर चालू असल्याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनां मिळताच स्पा सेंटरवर धाहाड टाकून चौकशी केली असता,चौकशी दरम्यान स्पा मालक योगेश चव्हाण, आणि स्पा व्यवस्थापक नौशाद शेख, या दोघांनी गेल्या अनेक दिवसा पासून स्पा मध्ये काम करणाऱ्या महिलांकडून वेश्या वेवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी स्पा मालक आणि व्यवस्थापकला ताब्यात घेत स्पा मधे देहव्यापार करणाऱ्या १० तरुणींची सुटका केली,
आरोपी स्पा मालक योगेश चव्हाण व स्पा व्यवस्थापक नौशाद शेख यांचा विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करून बेड्या ठोकल्या आहेत, व पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षका विद्या दैठणकर, महिला पोलीस शिपाई कोमल धनगर, हे करत आहेत,अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली

No comments:
Post a Comment