चंद्रकांत चौधरी यांच्या मागणीला यश,मालमत्ता करावरील शास्ती होणार माफ - In India Live

Breaking News

26/09/2025

चंद्रकांत चौधरी यांच्या मागणीला यश,मालमत्ता करावरील शास्ती होणार माफ

माथेरान.दि.२६ माथेरान मधील मिळकत धारक यांच्या थकबाकी वरील शास्ती माफ करावी अशी मागणी मालमत्ता धारक यांनी शहरप्रमुख यांच्याकडे केली होती अखेर शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख यांच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश आल्यामुळे आता माथेरान मधील मालमत्ता धारकांची शास्ती माफ होणार आहे.

माथेरान मधील मालमत्ता धारकांच्या करावरील शास्ती माफ व्हावी आशयाचे निवेदन शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती.त्यावर मुख्याधिकार्यांनी या निवेदनाची तात्काळ अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जाईल असे सांगितले होते.त्यानुसार 24 रोजीच्या पत्रानुसार येथील मालमत्ता धारकांची करावरील शास्ती माफ होणार आहे.त्यामुळे मागील थकबाकीदारांनी त्वरित आपले घरभाडे भरावे असे आवाहन पालिकेकडून अटीशर्थीवर करण्यात आले आहे.

                 

      काय आहेत अटीशर्थी

१. जे मिळकतधारक शास्ती (दंड) वगळता इतर थकीत मालमता कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी भरतील त्यांच्या बाबतीतच शास्तीच्या (दंड) सवलतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.


२. जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छिता अश्यांकडून विहित नमुन्यात प्रकरण ५० टक्के सवलत मागणीकरिता परिपूर्ण प्रस्ताव नगर परिषदेकडे सादर करावा लागेल विहीत नमुना नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध असून, त्या नमुन्यात अर्ज सादर करावा. अभय योजना एकदाच लागू आहे. थकीत मालमत्ता कराच्या रकमेवरील फक्त शास्तीस (दंड) अभय योजना लागू आहे. ५०% पर्यंत शास्ती माफ करणेबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार असून त्यांचे अंतिम निर्णयास अधीन राहून शास्ती माफी प्रस्ताव मागविणेत येत आहेत याबाबत मा. जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल.


३. दिनांक १९/०५/२०२५ नंतरच्या थकबाकी शास्तीस (दंड) अभय योजना लागू राहणार नाही.


४. प्रस्ताव सादर करताना आधार कार्ड छायांकित प्रत, मालमत्ता कराची मागणी बिल छायांकित प्रत, संपूर्ण कर कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment