प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील भाजपाच्या नगरसेवकाने पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ मेरठमधील कंकरखेडा परिसरातील आहे.
स्थानिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मेरठमधील कंकरखेडामध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी एका महिला वकिलासोबत जेवण करण्यासाठी आले होते.यावेळी हॉटेलचे मालक आणि त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद सुरु झाला. त्यानंतर हॉटेलच्या मालकाने भाजपाचे स्थानिक नगरसेवक मनिष पवार यांना घटनास्थळी बोलाविले.
मनिष पवार घटनास्थळी आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी भाजप नगरसेवक मनिष पवारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुढील तपास पोलीस करत आहेत.
x
No comments:
Post a Comment