प्रफुल चव्हाण, इन इंडिया लाइव
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने मागील पाच वर्षापासून महाराष्ट्रातील औरंगाबाद, ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात, विशेष शाळांमध्ये ० ते १० या वयोगटातील कर्णबधीर मुलांना आत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र बसविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साधारण एका लाभार्थ्यांस दोन कानाचे दोन यंत्र व सहाय्यक साधनं असे २५००० रूपयांचे यंत्र बसविण्यात आले. आजपर्यंत या उपक्रमात १५००० हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यंत्र बसविल्यानंतर त्या मुलांची भाषा, वाचा विकासाचा व विविध पातळीवरील विकासाचा आढावा देखील घेण्यात येत आहे.
यावर्षी उपरोक्त कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंच, टाटा ट्रस्ट, मुंबई, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, ठाकरसी ग्रुप मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील (पुणे, सातारा, सांगली, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, उस्मानाबाद, नांदेड, जालना, औरंगाबाद, लातूर, बीड, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगांव, बुलढाणा, सिंधुदुर्ग अशा एकूण २२ जिल्ह्यांमध्ये सामान्य व विशेष शाळांमधील कर्णबधीर मुलांसाठी नाव नोंदणी कर्णसाचाचे मोजमाप शिबीरे आयोजीत करण्यात आली होती.
६००० कर्णबधीर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी, शिवछत्रपती स्पोर्टस, कॉम्पलेक्स, बालेवाडी, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत मोफत डिजिटल श्रवणयंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणा-या लाभार्थ्यांची संख्या पाहता या कार्यक्रमाची नोंद ही जागतिक विक्रमासाठी प्रसिध्द असलेल्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा मानस आहे.
या कर्णबधिर मुलांना डिजीटल श्रवणयंत्र लावल्यानंतर ऐकू येणा-या ध्वनी लहरींमुळे, त्यांच्या चेह-यावर झळकणारा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी आपली उपस्थिती प्राथनीय आहे.
No comments:
Post a Comment