पहिल्या विजयोदूर्गोत्सव करिता, गुहागरच्या गोपाळगडला या - In India Live

Breaking News

16/10/2018

पहिल्या विजयोदूर्गोत्सव करिता, गुहागरच्या गोपाळगडला या






नम्रता देसाई, इन इंडिया लाईव


रत्नागिरी : दि.१६ शिवशाहीतील अभेद्य आरमारचा अविभाज्य भाग असलेल्या गोपाळगडावर तब्बल ३५० वर्षांनंतर दि. १८ ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात येत आहे. या पहिल्या विजयोदूर्गोत्सव करिता शिवप्रेमींनी गुहागरच्या गोपाळगडला यावे. 

येताना आपण कितीजण असणार आहात याची माहिती पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करून द्यावी अशी विनंती. गोपाळगड संघर्ष मोहिम : अक्षय पवार ८६५२७२७२६३, पंकज शोभा दळवी ९७०२१६१६१३

वयाच्या १७व्या वर्षीपासून शिवरायांवरील प्रेमाखातर ढिम्म प्रशासनाशी झगडत गोपाळगडची जाणूनबुजून केली जाणारी तोडफोड रोखणारा कोकणचा सुपुत्र गुहागर नागरिक अक्षय पवार, पंकज शोभा दळवी आणि दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकत्रितपणे गोपाळगडावर दसरा साजरा करणार आहेत.

हा कार्यक्रम व गडाची सद्यस्थिती कव्हर करण्यासाठी आपल्या वृत्त माध्यमातील प्रतिनिधी पाठवून बातमी करावी अशी विनंती. आपल्या सहकार्याने शिवाजी महाराजांच्या काळातील एक गड संरक्षणाच्या प्रयत्नांना आधार मिळू शकेल असा आशावाद तरुणांना आहे. तरी गोपाळगड संघर्ष मोहिमेसाठी सहकार्य करावे अशी विनंती.

पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे :
गोपाळगडची निर्मिती सोळाव्या शतकाच्या सुरुवातीची विजापूरच्या निजामांनी केली होती. आरमार उभारणीसाठी केलेल्या दाभोळच्या चढाईवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेल्या गडकोटांमध्ये सन १९६० मध्ये हा गड महाराजांनी सर केला. महाराज १६८०मध्ये महाराज गेल्यावर १६९९मध्ये सिद्धी खैरत खान याने हा गड जिंकला. पुढे सन १७४४मध्ये तुळोजी आंग्रे पेशवा साम्राज्यात मराठ्यांचा ध्वज पुन्हा एकदा गोपाळगडावर फडकवला. आंग्रे आणि पेशव्यांमध्ये कलगीतुरा झाल्यावर सन १७५५मध्ये पेशव्यांनी आंग्रेंकडून गडाचे अधिकार काढून घेतले. सन १८१८मध्ये पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर गडाचा ताबा ब्रिटिशांकडे गेला. 

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गोपाळगड हा अभेद्य तरी दुर्लक्षित गड. अंजनवेल बंदराला लागून असणारा हा गोपाळगड सन १९६० रोजी शासनाने युनूस मण्यार यांना अवघ्या ३०० रुपयांत विकला. 

या गडासाठी स्थानिक तरुण ८ वर्षे लढत आहेत. गडाची मालकी असली तरी तिथे सर्वांना प्रवेश खुला असावा असा फलक असूनही दाराला कुलूप लावून ठेवण्यात येते. गडाची मालकी मिळाल्यावर तिथे आंब्याची बाग लावण्यात आली. त्यासाठी एका ठिकाणी मोडकळीस आलेल्या तटबंदीला लागून असलेला सुमारे २० फुटी खंदक तटबंदीचे सामान वापरून बुजविण्यात आला आहे. आतमध्ये ट्रक नेण्यासाठी ही तटबंदी अजून तोडून रस्ता समतल करून बांधण्यात आली. पुरातन वास्तूची परवड होताना पोलीस, पुरातत्त्व खात्याने डोळे झाकून घेतले होते. 

असा गोपाळगड वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांनी दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा गोपाळगडला जुने वैभव कायम मिळावे, किल्ला संरक्षणासाठी शिवप्रेमींनी एकत्र यावे या उद्देशाने दसरोत्सवाचे आयोजन केले आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क गोपाळगड संघर्ष मोहिम अक्षय पवार ८६५२७२७२६३ पंकज शोभा दळवी ९७०२१६१६१३
x
x

No comments:

Post a Comment