रेल्वे एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ - In India Live

Breaking News

15/10/2018

रेल्वे एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, दि. १५ ऑक्टोबर - मुंबई पुणे  डेक्कन, व मुंबई नाशिक पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा प्रारंभ झाला. या गाड्यांमधील मासिक पासधारकांना पुस्तकांची ही आगळीवेगळी सेवा वर्षभर निशुल्कपणे उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे वाचनदूत या दोन गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देणार आहेत. या ट्रॉलीचे उद्घाटनही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. जैन उपस्थित होते. यावेळी  तावडे यांनी डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेस मधील प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांना प्रवासात वाचनासाठी पुस्तके दिली.
याप्रसंगी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले की ट्रेनमधील वाचनदूत हे तेथील प्रवाशांना भेटून पुस्तक देणार आणि मुंबईहून निघाल्यानंतर पुणेमध्ये गाडीमधून उतरताना पुन्हा जमा करणार. पुन्हा दुसऱ्यादिवशी याचपध्दतीने पुस्तक घेऊन वाचायचे आणि पुन्हा पुस्तक जमा करायचे असा हा उपक्रम आहे. दर दोन-तीन महिन्यानंतर पुस्तके बदलत जातील, त्यामुळे प्रवास तर चांगला होईल, वाचन करत होईल, असा हा प्रयोग डेक्कन क्वीन आणि पंचवटीमध्ये मुंबई-नाशिक, नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे, पुणे-मुंबई करीता हा उपक्रम सुरु करत असल्याचे मंत्री  तावडे यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वेमंत्री पिेयुष गोयल यांचे मी मनापासून आभार मानतो की, हा उपक्रम सुरु करण्यासाठी त्यांनी खुप मदत केली आणि मराठी भाषा विभाग व मध्य रेल्वे मिळून हा उपक्रम यशस्वी केला, असा विश्वास  तावडे यांनी व्यक्त केला.
आपल्याकडे मराठी, इंग्रजीमध्ये भरपूर पुस्तके आहेत, ।साहित्य आहेत आणि ज्याला जे वाचायचे आहे, त्याला तशी पुस्तके उपलब्ध करुन देणे हे सरकारला सहज शक्य आहे. कारण ही पुस्तके वाचून परत घेणार आहे. आपण १२००० वाचनालयाला पुस्तके देत असतो, त्यामध्ये ही दोन वाचनालये वाढलेली आहेत. पण चांगली दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करेल, असे तावडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment