तक्रार करायला आलेल्या महिलेचा पोलिसानेच केला विनयभंग - In India Live

Breaking News

13/10/2018

तक्रार करायला आलेल्या महिलेचा पोलिसानेच केला विनयभंग



महेश घोलप, इन इंडिया लाईव 

पुणे : दि. 13 पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार करायला आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग कार्यरत पोलिसानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित विवाहितेचे वय ३६ वर्ष असून आरोपी पोलीस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला १० ऑक्टोबरला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी आरोपी राजेंद्र पालवे या पोलिसाने, ‘मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, तिच्या खांद्यावर हात ठेवला’. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता  राजेंद्र पालवेे याने पीडित महिलेच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला, आणि आईकडे फोन दे असं त्याला सांगितलं.

मुलाने पीडित महिलेकडे मोबाईल फोन दिल्यावर पोलिसाने तीची विचारपूस करत सहानुभूती करत मदत करेन असे आश्वासन देत थेट ‘आय लव्ह यू’ म्हणाला. दुसऱ्यादिवशी त्याच्याविरोधात पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

त्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत.
x

No comments:

Post a Comment