महेश घोलप,इन इंडिया लाइव
पंढरपूर दि.22 विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षक पसार झाला आहे.
पंढरपूर,तालुक्यातील अजनाळे, गावातील नंदकुमार कोळवले वय 45, या शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.एवढ्यावरच न थांबता त्या शिक्षकाने नग्न अवस्थेत मोबाईलवर चित्रफीत करून, सोशल मीडीयावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,
पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी मैत्री करून,अकलूज येथे नेले.एका ठिकाणी खोली मिळताच त्यान दोघांच्या अंगावर थंड पेय ओतले थंड पेय सांडल्याचा बहाणा करून पिडीतीचे व स्वत:चे कपडे काढले,आणि विद्यार्थिनीवर बलात्कार केला.यादरम्यान, या सगळ्या प्रकाराचे चित्रफीत करून.कोळवले याने फोटो सोशल मीडीयावर व्हायरल केले.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांना हा प्रकार समजल्या नंतर, निर्भया पथकाद्वारे पिडीत विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला,व पिडीतिने ग्रामीण पोलिस ठाण्यात कोळवले याच्याविरुद्ध अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण,बलात्कार, अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाला असल्याचे समजताच शिक्षक कोळवले हा फरार झाला असून,पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे करीत आहेत.
गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणार्या या घटनेबाबत पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त जात आहे
No comments:
Post a Comment